Followers

Thursday, April 9, 2026

माणसे , परिवार बुवा बाबा भोंदू गिरी , तंत्र मंत्र जादूटोण्याच्या प्रकाराकडे का जातात?

 *माणसे , परिवार बुवा बाबा भोंदू गिरी , तंत्र मंत्र जादूटोण्याच्या  प्रकाराकडे का जातात?*



1: अदृष्टांची भिती: भविष्यात आपल्या जिवनात काय होणार? याची चिंता, हुरहूर लागते. त्यावर उपाय हा , मुल्ला, पाद्री,गुरुदादा, अम्मा बाबा देऊ शकतील ही अशा वाटून लोक बाबागिरी कडे आकर्षित होतात .

2: अदृश्य कामनांची पुर्ती: अनेक इच्छा, कामना, ज्या आपल्या आवाक्यात नसतात पण पुर्ण होण्याचा शॉर्टकट, फुकटात वर्षाव बाबाच करु शकतील ही भोळी आशा.

3:अपुऱ्या आणि महागड्या आरोग्य सुविधा: सतत किंवा दुर्धर आजाराने त्रस्त कुटुंबे शॉर्ट कट म्हणून बुवा बाबांकडून आशिर्वाद, दवा के साथ दुवा जरूरी म्हणून लोक अशा वातावरणा कडे आकर्षित होतात.

4: मानसिक आजार: साधारणः त भारतात मनोविकार ग्रस्त 7 ते 10% लोक आहेत त्यात गंभीर मानसिक आजार 1% लोकांना आहेत. यावर उपचार करणारे डॉक्टर अत्यंत मर्यादित, शिवाय या आजाराविषयी योग्य माहिती कमी आणि गैरसमज जास्त! बाबांची अध्यात्मिक आणि दैवी शक्ती खात्रीने यावर उपचार करेल ही आशा.

5: मनोकायिक आजार:जे केवळ सुचनेने बरे होतात वा तात्पुरते बरे झाले असे वाटते त्याचा लाभ श्रद्धाळू मनाच्या लोकांना होतो मात्र बाबाला श्रेय मिळून तो भावzखाऊन जातो 

6: वैफल्य ग्रस्त महिला: समाजातील लिंगभेदाच्या वातावरणात अनेकदा महिलांचे मन मोडून पडते. स्वतः हरल्याची भावना तयार होते. अनेकदा मुलींचे विवाह, दारुड्या नवरा , हुंड्यावरून, छळ याने त्रस्त लेल्या महिलांना भजन, पुजा, धर्म आचरण वाऱ्या बाबांच्या नावाने केल्या तर अशा मनाला वरवरचा आधार वाटतो. म्हणून  सत्संगी गर्दी होते, आश्रम महिलांनी फुलतात.

7: नशीब, प्राक्तन, नियती, प्रारब्ध, दैव रुसले!: या कल्पना घट्ट रुजलेल्या मनात बाबा आपले नशीब, प्रारब्ध दैव बदलून टाकेल असा विचार करून लोक अडकतात या जाळ्यात.

8: आत्मा, परमात्मा, मोक्ष, ब्रम्ह, परब्रम्ह, मुक्ती, शांती: परमा नंद देणाऱ्या या शब्दांचे भांडार ज्या बाबांकडून वारंवार वाटले जाते तिथं लोक भुलून जातात.

9: चमत्कार करणारे बाबा: चमत्काराला नमस्कार करुन त्यांची चकित्सा न करता डोळेझाकुन विश्वास ठेवणारे लोक यात फसतात.

10: गुरु गुरु परंपरा बहरली अन् भोंदू बाबांच्या अंगणी बरकत आली:

समाजात असलेली धार्मिक गुरु बाबत शरणागत भुमिका, गुरु म्हणजे उदात्त विचार करणारा व्यक्ती अन् शिष्य बापुडे! ही मानसिकता बुवाबाजी ला खतपाणी घालत असते . शिवाय गुरु शिष्य नाते पवित्र!! मग शोषण झाले तरी सहन होत नाही अन् सांगता येत नाही! अशी स्थिती होते.

11: अगतिकता, अस्थिरता व अपराधी भावना.:

A)जागतिकीकरणा नंतर आलेली असुरक्षित  आणि अगतिकता या मध्ये बाबांचा , शांती केंद्रांचा आधार वाटतो.

B.)कमालीची तीव्र स्पर्धा 

उदा. खेळाडू .. , व्यवसाय, धंदा, नोकरी.या मध्ये एक कृपाळू हात हवाच म्हणून बाबांचा आधार.

C. )अपराधी भावना. अनैतिक मार्गाने धन संपत्ती मिळवलेली असेल तर ती टिकावी, ओघ कायम राहील म्हणुन आणि त्यातून निर्माण झालेल्या अपराधी भावनेवर उतारा  बाबा बुवांचा आणि काही तीर्थ स्थळांचा आधार घेतला जातो .

12: विश्वाचे नियंत्रण करणारी शक्ती व अवतारवाद.

या विश्वाची नियंत्रक शक्ती जी कोणी असेल तिचा एजंट म्हणून साक्षात बाबांचा अवतार प्रगट झाला आहे असा भाव निर्माण होतो. काहीजण तशी जाहिरात बाजी करतात. भक्तांचा मग तांडा निर्माण होतो. नवी जमात जन्म घेते. हा तांडा आपले नवे नियम तयार करून महिन्यातून, आठवड्यातून एकत्र येतो. भेटी , विचार आदानप्रदान होतात.

13: धूर्तता व शक्य शक्यतेचा सिद्धांत:  मुलगा होणार की मुलगी? परदेश गमन योग येणार की नाही? यंदा कर्तव्य आहे की नाही? अशी शक्य शक्यतेचा प्रश्न आला की बाबा उत्तर देतात अन् तेच घडते. असं बोला फुलाला गाठ पडते अन् तेच घडते. अंदाज खरा  ठरतो शक्य अशक्य तेच्या नियमाने. पण बाबा भाव खाऊन जातो. मग उदो उदो त्याचाच वाढतो.

14: सांस्कृतिक दृष्ट्या व्यक्त होण्याची गरज:  आमच्या.. बाबांच्या दरबारी ! किती मज्जा च मज्जा ग! नाही पुरुष महिला भेद! वाटे सगळ्याच गमज्या ग!

 ग्रामीण भाग अथवा बंद फ्लॅट संस्कृतीत वाढलेल्या अनेकांना गरीब श्रीमंत, महीला पुरुष, सुशिक्षित अशिक्षित भेद न करता एकत्र येता येते. नाच, चर्चा वावर करता येतो. लोकांना हे वातावरण भावते. अशा मेळ्यांना मग बहर येतो.

राजकिय पुढारी ही स्वतः ला शिष्य म्हणवून घेत यात सामील होतात अनेक नोकरदार, शासकीय यंत्रणा वाले, धंदे वाले यात सहभागी होतात. साटेलोटे होते. अनेक भ्रष्ट कामांची युती होते. याचे लाभार्थी मग जनतेला बाबा कृपाळू असल्याची ग्वाही देतात. मग हे कोंडाळे वाढते.

15: अचिकित्सक समाज मन: श्रद्धेमुळे मानवी मन चिकित्सा करणे टाळते. निमूटपणे विश्वास हाच बुवा बाबा चा रस्ता सुकर करतो खास!

16: पैसा, सत्ता, गुंड आणि प्रचार माध्यमांची दहशत: पुढारी, पैसा, व्यापारी यांची सांगड भक्त म्हणून बाबा दरबारी होते. मग संघटित भक्त रक्षणासाठी गुंडांना पोसून विरोधात तक्रार करणाऱ्यांना दहशत दाखवतात. हल्ला, बदनामी, अब्रु नुकसान दावे दाखल करणे असा प्रकार करून धमकावून गप्प करणे. मग इतर कोणी बोलले की त्याला दडपण येत.

18: दैवी दहशत: बाबा बुवा दैवी सामर्थ्याने, चेटूक, टोटका जादूटोणा, भानामती करून आपले काही बरे वाईट करेल त्या पेक्षा भक्त कळपात सामील व्हा. असा सूर लावून अनेकजण प्रभावित होतात.

19: सुसज्ज यंत्रणा: राजमहाल, व्यवस्था, सुरक्षा रक्षक, तपासणी प्रचार साहित्य मीडिया वापरून भव्य ता निर्माण केली की देणगी, प्रभाव, वर्गणी दर्शन व्यवस्था गर्दी जमते.

20: राज्य मान्यता लोकमानसात जागा: आधुनिकता वापरून , काही चांगली कामे करुन लोकामध्ये प्रभाव निर्माण करता येतो. बाबा फेमस होतो. सिरीयल ग्रंथ महिमा पर्यटन स्थळ म्हणून विकास होतो. समाधी स्थळे, बाबा आशिर्वाद केंद्रांचा.

*बुवाबाजी यशस्वी होण्यामागची कारणे* व त्याचा प्रतिवाद कसा करावा?

बाबा, बापू, माता यांच्याकडे स्त्री पुरुष का गर्दी करतात ? 

   बाबा,बापू,माता इत्यादींकडे माणसे प्रचंड संख्येने जातात हे वास्तव आहे. ज्या अर्थी एवढ्या मोठ्या संख्येने स्त्री पुरुष बुवाकडे जात आहेत त्या अर्थी हे उघड आहे की हे बाबा बुवा त्यांची कुठली ना कुठली गरज भागवीत आहेत अथवा ही माणसे त्यांच्या जोरदार मार्केटिंग चे बळी ठरत आहेत. म्हणजे त्यांच्यासाठी एखादी गरज निर्माण करून ती भागविल्याचा आव हे बाबा बुवा आणीत असतात. जसे की एखादा काल्पनिक शत्रू उभा करायचा आणि त्याच्यापासून मुक्ती मिळविण्याचे सोपे तत्वज्ञान सांगायचे अथवा काल्पनिक स्वप्नांचा भूल भुलैया उभा करायचा.   

        बाबाकडे जाणारे गरीब आहेत तसेच श्रीमंतही आहेत, सामान्य जन आहेत तसेच नामवंत ही आहेत, स्त्रिया पण आहेत आणि पुरुषही. अशा कोणत्या गरजा वा मनाचा कमकुवतपणा ह्या लोकांना बुवाच्या दरबारात आणून दाखल करीत आहे? चला तर हे पाहू या.

   1)  आजच्या वेगवान जगात माणसाला एकटेपणा जाणवत असतो. आपल्या तक्रारी, दुःखे कुणाजवळ बोलावी,कुणाच्या खांद्यावर विश्वासाने मान टाकावी आणि सुरक्षा अनुभवावी असे जवळचे स्नेहसंबंध समाजात वा कुटुंबात अभावानेच दिसतात. ‘हे ही दिवस जातील आणि सर्व ठीक होईल’ असा दिलासा देणारे बाबा, माता अशा वेळी जवळचे वाटतात. 

    2) बाबा करण्यास सांगत असलेल्या गोष्टी त्याच्या आवाक्यातील असतात मग त्या निरर्थक का असेनात. बाबा सांगतो माझे/देवाचे नाम घे किंवा ते नाम वह्यातून भरभरून लिही. माझ्या पादुकांची पूजा कर वा उपवास कर. हे सर्व करणे त्याला सहज शक्य असते. त्यामुळे बाबाकडील गर्दी वाढत जाते. 

  3)माणूस हा जात्या आळशी आणि निष्क्रीय प्राणी आहे.तो सतत सोप्या पर्यायान्च्या शोधात असतो. परंतु बुवाबाजी हा पर्यायच नव्हे हे एक तर त्याला उमगत नाही किंवा उमगते तेंव्हा वेळ निघून गेलेली असते.चांगली नोकरी मिळविण्यासाठी नवी कौशल्ये आत्मसात कर, धन्द्यात बरकतीसाठी अथक परिश्रम करायला हवे. नवनव्या कल्पनांची कास धरायला हवी. 

  लवकर लग्न जुळवायचे तर पत्रिका,जात, पोटजात,गोरेपण अशा निरर्थक गोष्टी विचारात घेऊ नयेत. 

अभ्यासातील यशासाठी अभ्यासाचे तास वाढवणे, योग्य मार्गदर्शन घेणे गरजेचे आहे.असा कठीण पण विवेकी मार्ग बाबा सांगत नाहीत. त्यामुळे ते लोकप्रिय होतात.

    4)  माणसाला कळपात राहायला आवडते.एखाद्या गटात सामिल होण्यास तो उत्सुक असतो.तेथे त्याला सुरक्षेची ऊब मिळते. बाबाची लबाडी कळूनही ह्या उबेसाठी तो बाबा-बुवांच्या कळपात शिरतो. बाबाचा बिल्ला लाव, ठराविक पोशाख कर जसे की, काही माँ च्या स्त्रीभक्त पांढरी साडी नेसतात. खरात, वरात बाबा, आसाराम बापूंचे भक्त, दुसरा भक्त भेटला की ‘टॉम. टॉम’ , ... सारखा परवलीचा शब्द उच्चारतात. अशा साध्या साध्या गोष्टींतून त्यांच्यात एकजुटीची भावना निर्माण होते. अशा संघटीत जिण्याची माणसाची ओढ बाबा, माता पुरी करीत असतात. तिथे अनुभवास येणारे जेवणावळ, जपजाप,भजन असे सामुहिक जीवन सुखावणारे वाटते.

      5) आपल्याकडे पूर्वापार गुरु महात्म्याचे मोठे स्तोम आहे. त्यामुळे बाबा-बुवाकडे जाण्याला समाजमान्यता प्राप्त होते. कधी कधी हे गुरु देवाचे अवतार बनतात. त्यांच्या पासून येणाऱ्या आनंदलहरींनी आजार बरे होतात असा जोरदार प्रचार चालू असतो. दुर्धर आजार बरा झाल्याची गोष्ट तपासू जावे तर कुठल्या तरी दूरच्या गावी ह्या गोष्टी घडल्याचे सांगण्यात येते. लोकांचा कर्मविपाकाच्या सिद्धांतावर एवढा जबर विश्वास असतो की, बाबाचे शब्द खरे ठरले तर त्याचे श्रेय बाबाला आणि खोटे ठरले तर पूर्वजन्मीच्या पापाला दोषी ठरविण्यात येते. स्वतः वासनेचे शिकार बनलेले आसारामबापू सांगत असत की माझ्या नुसत्या दर्शनाने भक्ताच्या वासना आणि विकार गळून पडतात.

    6) स्त्रियांसाठी तर कित्येकदा गुरूच्या मठात जाणे ही एकमेव हक्काची उसंत ठरते. मी एकटी वा मैत्रिणींबरोबर चौपाटीवर फिरायला जाते म्हटले तर भुवया उंचावतात परंतु मी हरे-कृष्ण मंदिरात प्रवचनाला जाते म्हटल्यावर ती अभिमानाची बाब ठरते.

   7) स्त्रियांना समाजात आणि कुटुंबात दुय्यम स्थान असते त्या दुर्लक्षित असतात. नेमका याचं गोष्टीचा पुरेपूर फायदा स्त्रीलंपट बाबा घेत असतात. पुण्याचे वाघमारे, लातूरचे मल्लिनाथ, गुजराथचे आसारामबापू असा ह्या स्त्रियांशी गैरवर्तन करणाऱ्या बाबा बुवांचा सुकाळ आहे. बऱ्याच वेळा ते स्त्रियांची भावनिक आणि शारीरिक भूक भागवत असतात. त्यामुळे फारसा प्रतिकार होताना दिसत नाही.

      8) बुवाबाजीच्या प्रसाराला एक फार मोठी आर्थिक बाजू आहे. विशिष्ट देवस्थान हमखास नवसाला पावणारे आहे, अद्भूत सामर्थ्य असलेले, सर्व संकटे दूर करणारे देवस्थान आहे असा पद्धतशीर प्रसार केला जातो आणि त्यांच्या आश्रयात बुवाबाजी फोफावते. हा हा म्हणता त्या जागी विविध व्यवसायांचे जाळे उभे राहते.आधी चहाची टपरी,मग उपहारगृह त्यानंतर अतिथीगृह,फुले बिल्ले माळांची दुकाने जागोजागी उपटतात.वाहतूक व्यवसाय ही तेजीत असतो. एका ठराविक मार्गावर अपघातांचे प्रमाण का वाढले ह्याचा शोध घेऊ गेले असता वाहतूक खात्याला पोटावर हात फिरवून पुत्र प्राप्ती करून देण्याऱ्या भावनगरच्या पार्वतीमाचा शोध लागला. ह्या व्यवसायात आर्थिक लाभ होणारे लोक ह्या स्थानांचा आणि बुवांचा जोरदार प्रचार करतात.

     9)भ्रष्ट मार्गाने, विनासायास झटपट श्रीमंत झालेल्या लोकांच्या मनात एक तऱ्हेचे भय वसत असते. आपल्या पापाचे क्षालन करण्याची त्यांना गरज असते.असे भक्त देवस्थानांना व बुवा-बाबाना खोऱ्याने पैसे देत असतात. त्यांचे गंडे,दोरे व अंगठ्या अभिमानाने मिरवीत असतात.

    10) ज्यांच्या जीवनात अनिश्चिततेची सतत टांगती तलवार असते आणि मन त्याला सामोरे जाण्यास कमकुवत असते असे लोक बाबा-बुवांच्या जाळ्यात येतात. माझी फिल्म चालेल की पडेल,  माझे शतक झळकेल की मी शुन्यावर बाद होईन अश्या संभ्रमात असलेल्या नटाला वा खेळाडूला गुरु-बाबाची उपासना दिलासा देते.

   11) आपल्या देशाला हजारो वर्षाची अध्यात्मिक परंपरा आहे. इथे पोथ्या पुराणांची रेलचेल आहे.हे वातावरण बुवाबाजीला अत्यंत पोषक ठरते. 


     हे सर्व करताना आपल्या पैशाला पाय कसे फुटतात ह्याचे भान भक्ताला रहात नाही.एक बापू नामस्मरणाला बसायच्या आसनाचे दिवसाला ५०० रु. घेई. आणि अंधेरी क्रीडा संकुलासारखी जागा त्यासाठी आठवडाभर आरक्षित असे. यावरून बुवाबाजीच्या लागणीची तसेच बुवाच्या प्राप्तीची कल्पना येईल.

जोवर माणसापुढे अनुत्तरीत प्रश्न आहेत तोवर बाबा कडील  ही गर्दी कमी होणे कठीण आहे. 


*ही गर्दी कमी करण्यासाठीचे काही उपाय *

1) विज्ञानाचा सूर्य जसजसा वर येऊ लागेल तसतसा अंधश्रद्धेचा अंधःकार आपोआप दूर होईल असे वाटले होते. परंतु झाले उलटेच. विज्ञानाचाच वापर अंधश्रद्धा प्रसारासाठी होऊ लागला. गणपती दूध पिऊ लागला ही चंद्रास्वामीनी दिल्लीत पसरविलेली अफवा दूरदर्शन, दूरध्वनी मार्गे  भारतातच नव्हे तर अमेरिकेतील गणेशभक्तांपर्यंत हा हा म्हणता पोचली. तेंव्हा बाबाबुवांचे मायाजाल कमी करण्यासाठी शालेय शिक्षणापासून मुलांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्याची गरज आहे. त्यांच्यात प्रश्न विचारण्याची चौकस बुद्धी विकसित करायला हवी. तेंव्हाच हवेत हात फिरवून विभूती वा सोनसाखळी काढण्याची सत्यसाईबाबांची कृती हा चमत्कार नसून साधी हातचलाखी आहे हे लोक समजू शकतील. आणि बाबांच्या दरबारात होणारी गर्दी कमी होईल.

2)  माणसाच्या अगतिकतेचा गैरफायदा घेणाऱ्या बाबावर वचक ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्याने अलीकडेच पारित केलेला जादूटोणाविरोधी कायदा नक्कीच उपयोगी पडेल. आणि  कालांतराने अशा कारवायांना काही प्रमाणात रोधक ठरेल असे वाटते.

    3)  बाबाकडे गर्दी करणाऱ्यांमध्ये भीती,संशय,असूया किंवा औदासिन्य ह्यांनी त्रस्त अशी बरीच माणसे असतात. त्यांना खरी मानसोपचाराची गरज असते.असे मानसोपचारतज्ञ प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध हवे. त्याचप्रमाणे समाजात मानसिक आजारांबद्दल योग्य ती जाणीव निर्माण करायला हवी. ज्यायोगे अशा गरजूंना बाबा बुवाकडे जाण्याची वेळ येणार नाही. 

      4)   आपण पाहिले की आपली कुठली ना कुठली गरज पूर्ण करण्यासाठी माणसे बाबा-मातांकडे गर्दी करीत असतात.आपला आत्मविश्वास, विवेक आणि निर्भयता न गमावता आज जर माणूस आपली ही गरज भागवू शकला तर सवंग बुवाबाजीला थोडा आळा बसेल. संत तुकाराम, गाडगेबाबा संत विनोबा असे मानवतावादी व विवेकवादी अध्यात्म  शिकवणारे संत समाजाची ही गरज पुरी करू शकतील.

"कर्म करोनि म्हणती साधू,

ऐसे कैसे झाले भोंदू,

ऐसे कैसे झाले भोंदू.

     अंगी वैराग्याची कळा

  भोगी विषयाचा सोहळा

कर्म करोनी म्हणती साधू

ऐसे कैसे झाले भोंदू ?

    अंगा लावूनीया राख

  डोळे मिटूनी करिती पाप

कर्म करोनी म्हणती साधू

ऐसे कैसे झाले भोंदू ?

     तुका म्हणे सांगू किती

     जळो तयांची संगती

कर्म करोनि म्हणती साधू

ऐसे कैसे झाले भोंदू ?" 


हे सांगितलेले लोकाना  किती रुचेल आणि पटेल माहिती नाही. पण हे सत्य आहे.

  5)  आपले छंद,वा इतर सांस्कृतिक कार्यक्रमातुन माणसाला आनंदी सामुहिक जीवन अनुभवता यायला हवे. सार्वजनिक क्रीडाकेंद्र व छन्दवर्ग,ध्यानधारणेसाठी शांत जागा अशा तऱ्हेची विरंगुळ्याची  ठिकाणे व अवकाश अल्प मोबदल्यात जनतेला उपलब्ध व्हायला हवा.अशा सुविधा नागरी व सरकारी व्यवस्थापनाने दिल्या तर गुन्हेगारी,अनारोग्य ह्यालाही आळा बसू शकेल आणि भोंदू बुवा-बाबांकडे जाणारी गर्दी पण आटोक्यात येईल


************

आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके “जागृत” झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत… ❓

 आज समाजात मोठ्या वयाच्या अविवाहित मुली घरी बसून आहेत. आता देखील जर आई-वडील जागे झाले नाहीत, तर परिस्थिती अधिकच स्फोटक होऊ शकते… ❗🤔


आज आपण मुलांच्या लग्नाबाबत इतके “जागृत” झालो आहोत की नातीच जुळेनाशी झाली आहेत… ❓

समाजात आज 27-28-32 वयापर्यंत अनेक मुली अविवाहित , कारण त्यांच्या अपेक्षा कधी-कधी त्यांच्आहेतया परिस्थितीपेक्षाही जास्त असतात. अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला दिसतात.

यामुळे समाजाची प्रतिमा देखील खराब होत चालली आहे. 😔

सर्वात मोठा मानवी आनंद म्हणजे सुखी वैवाहिक जीवन.

पैसा आवश्यक आहेच 💰, पण तो मर्यादेपर्यंतच.

फक्त पैशासाठी चांगली नाती नाकारणे चुकीचे आहे.

पहिली प्राथमिकता सुखी संसार आणि चांगले कुटुंब हीच असावी. 🏡❤️

अधिक पैशाच्या मोहात चांगली नाती गमावणे योग्य नाही.

“संपत्ती विकत घेता येते, पण गुण नाही.”

माझ्या मते घर-परिवार आणि मुलाचा स्वभाव चांगला आहे का हे पहावे;

“जास्त” या अपेक्षेत चांगले नाते हातातून जाऊ देऊ नये.

सुखी वैवाहिक जीवन जगा. 🌸

30 नंतर झालेले लग्न अनेकदा तडजोड ठरते आणि वैद्यकीय दृष्टीनेही अनेक अडचणी निर्माण होतात. 🩺

आज याहूनही वाईट परिस्थिती कुंडली जुळवणीमुळे निर्माण झाली आहे.

ज्यांच्याशी कुंडली जुळते पण घर-परिवार किंवा मुलगा चांगला नाही,

आणि जिथे मुलामध्ये सर्व गुण आहेत तिथे कुंडली जुळत नाही—

अशा वेळी आपण सर्व काही चांगले असूनही फक्त कुंडलीमुळे नातं तोडतो. 🤷‍♀️

36 पैकी 20 गुण किंवा 36/36 गुण जुळूनही अनेकांचे संसार दुःखी आहेत,

कारण आपण मुलाचे खरे गुण पाहिलेच नाहीत.


कुंडलीच्या नावाखाली आधुनिक, सुशिक्षित समाजाला एक शतक मागे नेले आहे.

या चक्रात कित्येक चांगली नाती जुळतच नाहीत. 😞

आज मुलींसाठी नातं शोधताना

मुलामध्ये जणू २४ कॅरेट सोनं शोधल्यासारखं पाहिलं जातं,

आणि बघता-बघता चार-पाच वर्षे निघून जातात. ⏳

उच्च “शिक्षण” किंवा “जॉब” या नावाखालीही वेळ घालवला जातो.


मुलगा पाहण्याची पद्धतच वेळ वाया घालवण्याचं उदाहरण बनली आहे…

स्वतःचं घर आहे का❓

असल्यास फर्निचर कसं आहे❓

घरात खोल्या किती❓

गाडी आहे का❓ कोणती❓ 🚗

राहणीमान, खाणंपिणं कसं❓

भाऊ-बहिणी किती❓

आई-वडील कुणाकडे आहेत❓

बहिणींची लग्नं झाली आहेत का❓

आई-वडिलांचा स्वभाव कसा आहे❓

नातेवाईक आधुनिक विचारांचे आहेत का❓

मुलाची उंची किती❓

रंगरूप कसं❓

शिक्षण, उत्पन्न, बँक बॅलन्स किती❓ 💼💳

सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह आहे का❓

मित्र किती आहेत❓


आई-वडिलांना शहाणपण येतं तेव्हा मुलीचं वय 30 पार झालेलं असतं.

मग पुढची चार-पाच वर्षांची धावपळ मुलांच्या तरुणपणाचा बळी घेते. 😢

एक काळ असा होता की घराणं पाहून नाती ठरत.

ती नाती टिकायची.

विहीन- विहिणीमध्ये मध्ये आदर, प्रेम, जिव्हाळा असायचा. ❤️ धन कमी असलं तरी आनंद घरात भरलेला असायचा.

कधी मतभेद झाले तरी वडीलधारी माणसं ते मिटवायची.


घटस्फोट हा शब्दच अस्तित्वात नव्हता.

दांपत्य जीवन गोड-तिखट अनुभवांतून सरत जायचं.

दोघं एकमेकांच्या म्हातारपणाची काठी बनायचे,

आणि नातवंडांमध्ये संस्कार रुजवायचे. 🌱

आज ते संस्कार कुठे आहेत❓

लाज-शरम इतिहासजमा झाली आहे.

नात्यांमध्ये तडजोडीची वेळ येते.

आज मुलं-मुली समाजाबाहेरही लग्न करायला तयार आहेत,

आणि म्हणतात— “आमच्या समाजात आमच्यासारखा कोणीच नाही.”

मुलं-मुली स्वतःच्या इच्छेने लग्न करताना

तेव्हा कुणाला कुंडली आठवत नाही.

आई-वडीलही तेव्हा सगळं मान्य करतात.

तेव्हा पैसा, स्टेटस, इनकम काहीच अडथळा ठरत नाही. 🤷‍♂️


आता देखील आई-वडील जागे झाले नाहीत

तर परिस्थिती अधिकच गंभीर होईल. ⚠️

मुलींची लग्नं 22-23-24 वयात

आणि मुलांची 25-26 वयात झाली पाहिजेत.

सगळे गुण सगळ्यांमध्ये नसतात.

घर, गाडी, बंगला याआधी

वर्तन आणि स्वभाव तोलून पाहा.

आई-वडीलही आर्थिक झगमगाटात वाहून गेले आहेत.

पैशांच्या शर्यतीत नाती-गोती फार मागे पडली आहेत.

घरं तुटत आहेत,

प्रेम आणि आपुलकी आटत चालली आहे. 💔

या पिढीने कुटुंबसंस्थेचं असं तमाशा केलं आहे

की येणाऱ्या पिढ्या “संस्कार”

फक्त पुस्तकांत वाचतील. 📚

समाजाने आता जागं होणं अत्यंत गरजेचं आहे,

नाहीतर नाती शोधतच राहू…


आपली यावर काय प्रतिक्रिया आहे❓

आपले अमूल्य विचार कमेंटमध्ये नक्की मांडावेत.